Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिम्मित काॅग्रेंस पक्षाच्यावतीने विन्रम अभिवादन

करमाळा- साहीत्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्याआज साजऱ्या होणाऱ्या 53 व्या स्मृतीदिना निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी शहरामधील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन विनम्र अभिवादन केले.यावेळी उत्तरेश्वर सावंत,सुजय जगताप,दिपक पडवळे,नितीन चिंचकर,नितीन चोपडे,महेश गोसावी आदी उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा थोडक्यात उजाळा देत असताना सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहीत्याद्वारे एक नवी वैचारीक सामाजिक क्रांती घडवण्याचे कार्य त्यांनी केले.दुर्बल,वंचित,पिडीत,कष्टकरी बांधवांच्या व्यथा आपल्या साहीत्यातुन मांडुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.शोषणमुक्तीचा प्रचंड मोठा लढा त्यांनी ऊभा केला.अन्यायाच्या विरोधात पेटुन उठणारी माणसे त्यांनी उभी केली.त्यामुळे अशा या महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने आत्मसात केले पाहीजेत व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी करुन यासाठी आपण पाठपुरावा करु असे शेवटी बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी साठे नगर येथिल बांधव उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group