कदरच्या सरपंच सौ. मनिषाताई भास्करराव भांगे यांचा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे हस्ते सन्मान*
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील कंदर गावच्या महिला सरपंच सौ. मनिषाताई भास्करराव भांगे यांचे कार्याची दखल घेऊन आणि त्यांनी कंदर येथे राबविलेल्या विविध विकास योजना, महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन योजना, कोरोना काळात नागरिकांना दिलेली विशेष आरोग्य माहीती आणि मदत यामुळे त्यांची दखल घेऊन राज्यातील अशा अकरा ग्रामपंचायतींमध्ये कंदर गावची निवड होऊन त्याचे पुस्तकरूपी माहीती पुस्तिकेचे प्रकाशन आज पुणे येथील पत्रकार भवन येथे झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे हस्ते सरपंच सौ. मनिषाताई भांगे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन विशेष अभिनंदन होत आहे. याप्रसंगी कंदरच्या सरपंचाचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याची भावना डॉ. बाबा आढाव यांनी मांडली.
