सोगावचे विद्यमान सरपंच श्री विजय गोडगे व गावकऱ्यांनी मानले महावितरण कर्मचाऱ्याचे आभार…..
सोगाव प्रतिनिधी
आज काल रात्री अपरात्री लाईट चे काम करायचे असल्यास आपण सगळे किती तरी वेळा विचार करतो,पण आपल्यासाठी सदैव सेवेत असणारे वायरमन हे कधीही न विचार करता गावाच्या लाईन दुरुस्ती साठी झटत असतात…असाच आज आमच्या गावामध्ये प्रकार झाला..महावितरण चे कर्मचारी श्री दादा सरडे व रितेश गोडगे गावामध्ये कायम सहकार्य करणारे सर्वांशी मनमोकळे पणाने वागणारे आमचे हे परम मित्र.आज गावामधे रात्रीच्या वेळी लाईट गेली असता साहेबांना कॉल केला,त्यांना माझी समस्या सांगितली,त्यांनी वेळेचा विलंब न करता पुढील अर्धा तासात गावात आले आणि लगेच लाईन फॉल्ट शोधण्यास सुरुवात केली.फॉल्ट काढून ताबडतोब लाईन चालू केली.मी आणि माझ्या गावाच्या वतीने सर्व महावितरण कर्मचारी यांचे आभार मानले आहे.
