करमाळा

महाराष्ट्रात आर आरसीची कारवाई सर्व कारखान्यावर झाली असून मकाईचे कर्ज प्रकरण मार्गी लागत असताना जाणीवपूर्वक बँकांचे सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न-दिनेश भांडवलकर

करमाळा प्रतिनिधी- आरआरसी ची कारवाई महाराष्ट्रातील एफ आर पी न दिलेल्या प्रत्येक कारखान्यावर सदरची कारवाई होत आहे. तर मकाई कारखान्याची साखरही केंद्र सरकार व राज्याच्या नियमानुसार विक्री करून मागील आणि चालू वर्षाची देणी दिली. सदरची देणे देताना स्वतः कारखान्याने कोणतेही कर्ज कोणत्याही बँकेकडून न घेता ही सर्व देणे आदा केली गेली. याच खरंतर कौतुक करणे गरजेचे असताना देखील शेतकरी सभासदाला अडचणीत आणणे आणि मुद्दामुन कारखान्याची बदनामी करणे या करता बेछुट आरोप करून आता कर्ज प्रकरण मार्गी लागत असताना जाणीवपूर्वक बँकांचे आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जात आहे. यावेळी मात्र आम्ही अशा बेछुट आरोपांना आता अब्रू नुकसानीचा दावा दाखल करूनच उत्तर देऊ असे मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आज स्पष्ट केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group