करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालयाला संगणक ,प्रिंटर खुर्च्या भेट


करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचा 31 जुलै हा वाढदिवस असतो. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या वाढदिवसाचे निमित्त साधून अनेक समाज उपयोगी उपक्रम अनेक वर्षापासून राबविले जात आहेत.
यापूर्वी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका यांचा सन्मान करून त्यांना गणवेशाची साडी भेट देणे ,वृक्षारोपण कार्यक्रम घेणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, मुलांना वह्य वाटप करणे आदी उपक्रम यापूर्वीच राबविले आहेत. यावर्षी तहसील कार्यालयामध्ये खुर्च्यांची कमतरता आहे हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून तहसील कार्यालयासाठी 25 खुर्च्या तसेच 2 संगणक व प्रिंटर भेट देण्यात आले. इथून पुढेही शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याची भूमिका कार्यकर्त्यांची राहील.
गेल्यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एसटी महामंडळाच्या परिसरामध्ये वृक्षरोपण करणे, झाडांना ट्री गार्ड लावणे, परमवीर चक्र प्राप्त सैनिकांचा इतिहास फ्लेक्स च्या माध्यमातून मांडणे इत्यादी उपक्रम कार्यकर्त्यांनी घेतलेले होते. आजच्या या खुर्च्या वितरण व संगणक वितरण कार्यक्रम प्रसंगी करमाळा तालुक्याच्या तहसीलदार सौ.शिल्पा ठोकडे प्रांत अधिकारी सौ प्रियांका आंबेकर यांच्यासह संजयमामा शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group