सोलापूर येथील शांतता रॅलीला जाण्यासाठी 100 चार चाकी व 100 दुचाकी गाड्यांना इंधन देणार.-प्रा.रामदास झोळ सर*
करमाळा प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे 7 ॲागस्ट रोजी शांतता रॅली होनार आहे. या रॅलीसाठी करमाळा तालुक्यातुन मराठा समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत.करमाळा तालुक्यातुन मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या बांधवांना 100 चार चाकी गाड्यांसाठी डिझेल व 100 दुचाकी गाड्यांसाठी पेट्रोल मोफत देणार असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की जिल्हाभरातून तसेच जिल्या बाहेरूनही मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने सोलापूर येथे दाखल होणार आहेत. आपणही बहुसंख्येने उपस्थित राहावे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणुन सोलापूर येथे शांतता रॅली काढण्यात येणार असून. सदर शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून मराठा समाज, बहुजन बांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत. या शांतता रॅलीला जाण्यासाठी समाज बांधव मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आपल्याकडून एक खारीचा वाटा म्हणून मराठा समाजाच्या या लढ्याला एक प्रकारची मदत म्हणून करमाळा तालुक्यातील नागरिकांना 100 चार चाकी गाड्यांना इंधन व 100 दुचाकी गाड्यांसाठी पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. दुचाकी वाहनधारकांनी शक्यतो जास्तीत जास्त बुलेट गाडी आणण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे. ज्याप्रमाणे मुंबई येथील आंदोलनाला जाण्यासाठी भिगवण येथे इंधनाची सोय केली होती. त्याचप्रमाणे सोलापूरला जाण्यासाठी पुणे सोलापूर हायवे वरती इंधनाची सोय केली जाणार आहे. तरी यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील इच्छुक समाज बांधवांनी प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन करमाळा संपर्क कार्यालय बारा बंगले विकासनगर करमाळा येथे संपर्क करून नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे . संपर्क मोबाईल नं. 9405314296
