लव्हे आश्रमाचे गुरूवर्य वै.श्री संत आनंदयोगी महाराज यांचे शुक्रवारी प्रथम पुण्यस्मरण
जेऊर प्रतिंनिधी
करमाळा तालुक्यातील लव्हे येथील माँ शारदा आश्रमाचे वै.श्री संत आनंदयोगी महाराज यांचे प्रथम पुण्यस्मरण येत्या शुक्रवारी 12 आॕगस्टला दुपारी 12.05 वाजता करण्यात येणार आहे.आनंदयोगी महाराज यांचे गेल्या वर्षी 23 आॕगस्टला निधन झाले होते, तिथी नुसार त्यांचे प्रथम पुण्यस्मरण 12 आॕगस्टला होणार आहे, यावेळी जेऊर येथील हभप ज्ञानेश्वर फुले महाराज यांचे हरि किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. तरी श्रध्दांजली वाहण्यासाठी भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.
