करमाळा मतदार संघातील जेऊर, केम, पारेवाडी,जिंती रेल्वे स्टेशनच्या प्रवाशांचे मागणीचा आमदार. संजयमामा शिंदे यांचे कडुन पाठपुरावा- केंद्रीय रेल्वे मंत्री यांना पत्र
करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्यातील जेऊर,केम, पारेवाडी ही महत्वाची रेल्वे स्टेशन असुन येथील प्रवाशांच्या मागणीचा पाठपुरावा करताना आमदार. संजयमामा शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्रातुन त्यांनी जेऊर,केम,पारेवाडी, कुर्डुवाडी येथे एक्सप्रेस गाड्यांना प्रवाशांचे मागणीचा विचार करून थांबा देणेबाबतची मागणी केलेली असुन, पारेवाडी, रामवाडी, जिंती, गुलमरवाडी, भगतवाडी येथील रेल्वे गेट बंद करून बोगदा करून रस्ता केला आहे, परंतु या बोगद्यांची व रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची होत असुन, त्या ठिकाणी रस्ते, ड्रेनेज गटारी, सिमेंट वॉल करीता जादा निधी देणेबाबतची मागणी केलेली आहे. तसेच पारेवाडी आणि जिंती या ठिकाणी कुर्डुवाडी प्रमाणेच ओव्हरब्रीज मंजुर करणे बाबत मागणी केलेली आहे. आमदार. संजयमामा शिंदे यांनी नुकताच करमाळा तालुका आणि माढ्यातील ३६ गावचा गावभेट दौरा यशस्वी पार पाडलेला असुन, विविध विषयाबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा चालु केलेला आहे. करमाळा मतदार संघात विकास कामाचे बाबतीत आमदार. संजयमामा शिंदे यांचा सततचा पाठपुरावा चालु असुन, त्यामुळे नागरिकांमधुन समाधान व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती आमदार. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाचे वतीने प्रसिद्ध करण्यात आली.
