Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

करमाळा शहरातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा – विशाल गायकवाड युवा सेना शहर प्रमुख करमाळा

 

करमाळा प्रतिनिधी :- करमाळा शहरात तालुक्यातील बहुसंख्य नागरीक हे शहरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी येत असतात. तसेच शहरामध्ये विविध शाळा, विदयालये, महाविदयालये असून विदयार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते अशा परिस्थितीत करमाळा शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सदर मोकाट जनावरांचा नगरपरिषदेच्या वतीने तात्काळ बंदोबस्त करावा असे निवेदन युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांना दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मागील काही वर्षात याबाबत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत तसेच एका नागरिकाला यामध्ये जीवही गमवावा लागलेला आहे. तरीही नगरपरिषद या बाबीकडे गांभीर्य पूरक पाहत नाही. यापुढे जर कोणाच्या जीविताला मोकाट जनावरांमुळे धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेची राहील. तरी याबाबत तात्काळ कार्यवाही करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे, तालुका समन्वयक दादासाहेब तनपुरे, छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राणजित गवंडी, युवासेना शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपतालुका प्रमुख युवा सेना अशोक रणदिवे, हनुमंत रंधवे, समीर हलवाई, अविनाश भिसे, युवा सेना तालुका सचिव पांडुरंग ढाणे आदी जण उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group