Tuesday, April 22, 2025
Latest:
आरोग्यसकारात्मकसामाजिक

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन वायरमन अमोल जागले याच्या उपचारासाठी  श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे २ लक्ष रूपयांची थेट आर्थिक मदत

 

नाशिक :(इगतपुरी

इगतपुरी विभागातील महावितरण मध्ये अमोल जागले हा कंत्राटी कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतानाचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. प्रसंगी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात पोहत जात अमोल आपली सेवा बजावत होता. त्यावेळी काम करत असताना अपघात झाल्याची बातमी प्रसार माध्यमांमार्फत संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांस समजताच त्यांनी तात्काळ मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज नाशिकच्या नारायणी हॉस्पिटलमध्ये भेट देत हि मदत सुपूर्द केली.तसेच पुढील उपचाराचा संपूर्ण खर्च आणि कृत्रिम पाय बसविण्यासाठी देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातुन सर्वोतोपरी मदत करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यानी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group