घारगावात झाली ड्रोनद्वारे मोजणी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाचा फायदा होणार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील घारगाव येथे आज सकाळी ड्रोन द्वारे मोजणी करण्यात आली ड्रोन सर्वेक्षणाद्वारे नागरिकांना गावठाणाची अचूक माहिती मिळणार आहे त्यामुळे आणि गावातील तंटे वाद मिटवून जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी ड्रोन द्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाचा फायदा होणार आहे ड्रोन सर्वेक्षणामुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वे होऊन प्रत्येक घराचा नकाशा सीमा क्षेत्र याची अचूक माहिती मिळणार आहे कर्ज उपलब्धता विविध आवास योजनेस मंजुरीसाठी जागेचे मालकी हक्क दाखवण्यासाठी मालमत्तेचा अधिकार पुरावा मिळकत पत्रिका स्वरूपात मिळण्यासाठी या संरक्षणाचा फायदा होणार आहे त्यावेळी गावातील मोजणीच्या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते माजी सरपंच किरण दादा पाटील मा सरपंच दादा पाटील सरपंच राजेंद्र भोसले ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तूद संतोष होगले राजेंद्र पवार विकास सरवदे सुरेंद्र होगले अक्षय पाटील सुभाष डीसले रोहित बारस्कर समाधान सरवदे चंद्रकांत शिंदे अनेक जण उपस्थित होते.
