Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसहकार

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आदिनाथ सुरू होणार आदिनाथ मंदिर संगोबा येथे अभिषेक

 

करमाळा प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत हे खऱ्या अर्थाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संकट मोचक ठरले असून त्यांनी मनाचा मोठेपणा करून करमाळा तालुक्याचे हित जोपासण्यासाठी केलेली कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली यामुळे करमाळा तालुक्यातील जनता त्यांची ऋणी आहे असे सांगत आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीने मंत्री सावंत यांचे आभार मानले आहे

आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकार तत्वावर चालवावा व बारामती ॲग्रो साखर कारखान्याने आदिनाथ कारखान्या हडप करण्याचा आखलेला डाव हाणून पाडण्यासाठी आदिनाथ मंदिर संगोबा येथे सहा महिन्यापूर्वी आदिनाथ बचाव समितीची पहिली बैठक झाली होती या बैठकीत आदिनाथ सहकार तत्वावर सुरू व्हावा यासाठी आदिनाथ महाराजांना साकडे घालण्यात आले होते
या प्रथम बैठकीसाठी डॉक्टर वसंतराव पुंडे धुळा भाऊ भाऊ कोकरे देवानंद बागल महेंद्र पाटील शहाजीराव देशमुख सर महेश चिवटे
अण्णासाहेब सुपनवर एडवोकेट देशपांडे रवींद्र गोडगे बाळासाहेब गायकवाड गौंडरे चे हनपुडे सर चंद्रकांत सरडे किरण कवडे संतोष पाटील रमेश कांबळे आधी शेकडो सर्व गटातटाचे पदाधिकारी उपस्थित होते
तत्कालीन परिस्थितीत काहीजण बचाव समितीच्या मागणीला यश कदापी येणार नाही अशी सांगत बचाव समितीची टर उडवत होते मात्र आदिनाथ महाराज एवढे जागृत असून आदिनाथ चा नाद करणाऱ्याचा आदिनाथ नाद पुरा करतो आज दिसून आले आहे
आदिनाथ महाराजांच्या आशीर्वादामुळेच सर्व घडामोडी घडून पुन्हा सभासदाच्या मालकीचा कारखाना राहिला अशी भावना प्रत्येक सभासदाच्या मनात आहे
यानंतर आदिनाथ बचाव समितीने करमाळा तालुक्यात गावोगाव बैठका घेऊन आदिनाथ सहकार तत्त्वावर चालला पाहिजे याबाबत जनजागृती केली यावेळी आदिनाथ कारखान्याच्या संचालिका
व बागल गटाचे नेत्या रश्मी बागल कोलते यांनी यांनी पुढाकार घेत बचाव समितीच्या मागणीनुसार तात्काळ विशेष सर्वसाधारण सभा बोलून आदिनाथ कारखाना बारामती ऍग्रो ला भाडेकरारराव देण्याचा ठराव रद्द केला
आदिनाथ कारखाना वाचवण्यासाठी न्यायालय लढ्यामध्ये रश्मी बागल कोलते यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी आमदार नारायण आबा पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे
आदिनाथ चे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे पदाधिकाऱ्यांनी या कारखान्याला मदत करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना केली यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी महत्त्वाचे सहकार्य करून प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून आदिनाथ कारखाना सहकार तत्त्वावर सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.आदिनाथ बचाव समितीने ज्या उद्देशाने ही मोहीम उघडली होती तो उद्देश सफल झाल्यामुळे आज आदिनाथ मंदिर संगोबा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णा सुपनवर यांनी आदिनाथ कारखान्यावर अभिषेक केलाआदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचा भव्य नागरी सत्कार लवकरच करमाळा येथे करणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group