राजुरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न*
करमाळा प्रतिनिधी 20 ऑक्टोंबर बुधवार रोजी. राजुरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत महत्त्वाचे ठराव पास झाले. (1) लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही (2) सोमवारपासून आठवडी बाजार सुरू होणार (3) जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाणी मिळणार (4) वीज उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करणार.(5) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आय एस ओ दर्जाची करणार(6) तरुणांसाठी अद्यावत व्यायाम शाळा उभा करणार(7) सार्वजनिक ग्रंथालय उभारून स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार* असे मुख्य ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात राजुरी गावातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, पोलीस पाटील माऊली चिंचकर, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शितोळे गुरुजी,जाधव गुरुजी, प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी चे डॉक्टर कापसे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत टापरे,संजय जाधव, गणेश जाधव,कैलास साखरे, दत्तात्रय दुरंदे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
