करमाळा तालुक्यातील रायगाव गणामध्ये पंचायत समितीसाठी दिपक राख यांच्या नावाला पंसदी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती च्या निवडणुकीमध्ये रायगाव गणामध्ये शिवसेना युवासेना तालुकाध्यक्ष दिपक राख यांच्या नावाची चर्चा होत असून दिपक राख माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे खंदे समर्थक असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण आबा पाटील यांना रायगाव भागातुन दुसऱ्या क्रमांकाची मते दीपक राखनी मिळवून दिली असुन जनतेचे मोठे पाठबळ त्यांना असल्याचे दिसुन येते. दीपक राख यांनी गेल्या पाच वर्षात त् नागरीकांबरोबर सुसंवाद ठेवून या गणातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते सदैव कार्यरत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये यांच्या नावाला अधिक पसंती असून तरुण युवकांमध्ये व महिला भगिनींमध्ये त्यांच्याबद्दल पंसदी असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून ग्रामीण भागामध्ये सदैव नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वांना संकटात मदत करून त्यांच्या कामासाठी 24 तास वेळ देऊन काम करणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे एक सुशिक्षित तरुण तडफदार नेतृत्व म्हणून दिपक राख यांच्याकडे पाहिले जात असल्याने पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना पंचायत समिती सदस्य म्हणून येथील नागरिक नक्कीच निवडून देऊन आपल्या गणाचा विकास करण्याची संधी देतील असा विश्वास येथील नागरिकांना असल्याने दिपक राख यांच्या नावाला अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे.
