गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल कमी किंमतीमध्ये थंडगार पाणी अन् चवही न्यारी ग्रांहकांनी याचा लाभ घ्यावा -नवनाथ क्षिरसागर
करमाळा प्रतिनिधी
उन्हाची चाहूल लागताच ग्राहकांसाठी बाजारपेठेत मातीचे माठ विक्री सुरू केली असल्याचे करमाळा येथील माठ विक्रेते कुभांर नवनाथ क्षिरसागर यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे असले तरी गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे प्रमाण कमी झाले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे शिवाय नियमातही शिथीलता आहे त्यामुळे पुन्हा गरिबांचा फ्रीज असलेला माठ भवानीनाका येथेे माठाची विक्री करता दाखल केला आहे . नेमकी परिस्थिती काय ओढावते म्हणून यंदा दरात वाढ करण्यात आली नाही. तर मातीचे माठ हे १८० रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कुंभार व्यवसाय करणाऱ्या वर उपासमारीची पाळी आली होती त्यातून तो आता कुठे सावरला आहे त्यामुळे स्थानिक असणाऱ्या कुंभाराकडून आपण माठ खरेदी करावे असे आवाहन कुंभार व्यावसायिक नवनाथ क्षीरसागर यांनी केले आहे .


