मुथा नॉलेज फाउंडेशन अबॅकस आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॉफीचा वर्षाव

करमाळा प्रतिनिधी.26 व 27 जुलै रोजी झालेल्या अरिस्टो किड्स आयोजित ऑनलाइन अबॅकस वैदिक मॅथ, शाब्दिक उदाहरणे ,जनरल नॉलेज या परीक्षेत मुथा अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी मधून ९० विद्यार्थ्यांचा इरा पब्लिक स्कूल जेऊर सह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता.
या परीक्षेचा निकाल ऑनलाईन सात जून रोजी डिक्लेअर करण्यात आला.
यामध्ये करमाळा येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमी उच्चांक मिळवलेल्या अकॅडमी ला 75 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
या अवॉर्ड्सचे बक्षीस वितरण 14 सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण विजयश्री सभागृह येथे संपन्न झाले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य मिलिंद फंड सर, प्रा . गणेश जी करे पाटील सर, प्रा. अनुपमा बागल मॅडम सुनील अवसरे सर, डॉ. हर्षदा मगर (बारामती कान नाक घसा तज्ञ)
आदर्श शिक्षक तात्यासाहेब जाधव, डॉक्टर संकेत कांबळे, जगदीश शिगजी
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ पार पडला, यावेळी विद्यार्थ्यांचे डेमोही सादर करण्यात आले. सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. गणेश करे पाटील सर यांनी आपल्या मनोगतात अबॅकस विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्वल करावयाचे असेल आपल्यासाठी जी पालकांनी पाहिलेली स्वप्ने आहे ती पूर्ण करावयाची असेल तर विद्यार्थ्यांनी abacus चे परिपूर्ण नॉलेज घेणे. गरजेचे आहे. प्राचार्य फंड सरांनी. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनीही नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे व आपल्यामध्ये परिवर्तन केले पाहिजे. आपला मेंदू जर ह्या माध्यमातून गती वाढवत असेल व्यावहारिक हिशोब कॅल्क्युलेटर च्याही फास्ट होत असेल तर पालकांनी विद्यार्थ्यांना अबॅकस शिकवावे व या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांनाही आपापली मनोगते व्यक्त केले. क्लासचा टॉपर जीनियस सार्थक वनारसे या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या अकॅडमी मधून दहा लेव्हल कमी कालावधीत पूर्ण करणारा विद्यार्थी आहे.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापिका ज्योती मुथा, सहशिक्षिका वनारसे मॅडम शिंदे मॅडम सावंत मॅडम व गवळी मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले.


