आरोग्यकरमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्यावतीने कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या जयंतीनिमित्त एप्रिल महिन्यात भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन


करमाळा प्रतिनिधी : आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने तसेच कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या जयंतीनिमित्त एप्रिल महिन्यात विविध आजारांवरील भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे करमाळा परिसरातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सवलतीच्या दरात तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत मुळव्याध (पाइल्स) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दि. ५ एप्रिल रोजी किडनी विकार, प्रोस्टेट ग्रंथी व मुतखडा आजारांवरील शिबिर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.
दि. १० एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत फुफ्फुसांचे आजार (दम लागणे, अस्थमा, टीबी), हाडांचे आजार, लहान मुलांचे हृदयरोग तसेच हृदयविकार तपासणी अशी विविध शिबिरे एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहेत. दि. ११ एप्रिल रोजी केसांच्या समस्यांवरील शिबिर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
दि. १२ एप्रिल रोजी दातांची कवळी व रूट कॅनॉल उपचारांवर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असून, दातांची कवळी मूळ किंमत २५,००० रुपये असताना सवलतीच्या दरात १२,५०० रुपये आणि रूट कॅनॉल उपचार ४,००० ऐवजी २,००० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच दि. १५ एप्रिल रोजी मेंदूविकार व हृदयविकार तपासणी शिबिरे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आली आहेत. दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर नागरिकांना मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत. सर्व शिबिरे जाधव-पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा येथे होणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!