वाशिंबे येथे नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न124 जणांची तपासणी करून चष्म्याचे वाटप
वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे येथे बुधराणी हॉस्पिटल, पुणे तसेच पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, डोळ्यातून पाणी येणे,लासरू,नंबर काढणे व डोळ्यांच्या संदर्भात आजार इ.चे निवारण करण्यात आले व अल्प दरात चष्मे वाटप केले. या कार्यक्रमाचे उद्घघाटन यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ,माजी.सरपंच श्री.शहाजी दादा झोळ, मा.सरपंच श्री. भगवानराव डोंबाळे,यांच्या हस्ते झाले.यावेळी संपत झोळ,तुकाराम बापू झोळ,अमोल भोईटे,संदिप झोळ उपस्थित होते..१२४ जणांचे डोळे तपासणी करून चष्मा वाटप करण्यात आले.
