वाशिंबे ग्रामपंचायतीकडून वंचित घटकांना कचराकुंडी डस्टबिनचे वाटप
करमाळा प्रतिनिधी
वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवार दि.१८रोजी गावातील १५३ वंचित कुटूंबियांना घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले.वाशिंबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील दोन वर्षे स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत.यामध्ये मागासवर्गीय बांधवांना फॅन,गावातील प्रमुख चौकात सौर ऊर्जेचे दिवे,ग्रामस्थांना आरओचे स्वच्छ पाणी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कार्यालयीन साहित्य त्याचाच एक भाग म्हणून आज गावातील वंचित कुटुंबांना कचरा व्यवस्थापनासाठी कचराकुंडीचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
