Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा नगर परिषद शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक बिनविरोध

करमाळा प्रतिनिधी, दि. १९ सप्टेंबर- करमाळा नगर परिषद अंतर्गत करमाळा शहर पथविक्रेता निवडणूक बिनविरोध पार पडली. नगरपरिषद पथविक्रेता सदस्य समितीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री. सचिन तपसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. निवडून आलेल्या नगर पथविक्रेता समिती मधील सदस्य यांचे अभिनंदन निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री. सचिन तपसे यांनी केले.

नगर पथ विक्रेता समिती मध्ये बिनविरोध निवडून आलेले सदस्य 1) रंजना विठ्ठल – इतर मागास वर्गीय महिला 2) छाया दिगांबर सिरसट – खुला महिला 3) जमीर गफार – अल्पसंख्यांक पुरुष, 4) सावताहरी कचरू कांबळे – अनुसुचीत जाती – पुरुष, 5) संताजी संजय घोरपडे – खुला पुरुष , 6) संजय नारायण घोरपडे – खुला पुरुष हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद राखुंडे, कार्यालयीन अधिक्षक स्वप्नील बाळेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुषार टांकसाळे, शहरातील पत्रकार बंधु तसेच पर्थविक्रेते उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले व सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group