करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्याबाबत स्थगिती उपसभापती चिंतामणी जगताप यांना दिलासा बागल गटामध्ये उत्साहाचे वातावरण
करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यपद जावे म्हणून विरोधकांनी खुप प्रयत्न केला होता परंतु त्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे अशी माहिती उपसभापती चिंतामणी जगताप यांनी दिली आहे. यावेळी बोलताना सांगितले की,मला वाटत होते की , साहेबांचा पतुळा अनावरण व करमाळा बाजार समिती कर्ज मुक्त आम्ही केली यावरतीच मला समाधान मानावे लागते की काय ? परंतु आमचा न्याय पालिकेवर असलेला विश्वास आणि दिग्विजय बागल व रश्मी बागल असलेली राजकीय ताकद या वरती मला पुर्ण विश्वास होता , डिडिआर यांनी जेंव्हा माझ्या विरूध निकाल दिला तेंव्हा मी खचलो नाही आणि आता वरीष्ठ कार्यालयाने माझे पद राखले त्यामुळे मी हुरळुन जाणार नाही ! करमाळा बाजार समितीत आणखी बरीच कामे करण्याची आहेत जसे की , करमाळा व जेऊर येथील बाजार समिती हद्दीत पेट्रोल पंम्प उभारणे ,कंदर उपबाजार उभारणे , भाजी मंङई निलावाची वेळ पहाटे 4 ऐवजी 6 करणे जेणेकरून लांबुन येणाऱ्या तरकारी मालास योग्य बाजार व न्याय मिळेल तसेच वाहन प्रवेश फी बंद करणे ही सर्व कामे व इतर विकास कामे सभापती व आम्ही सर्व बागल गटाचे संचालक बागल यांच्या मार्गदर्शना खाली करणार आहोत ! कावळा , ङोमकावळा ही भाषा सोङुन आपण माणसं आहोत आपण माणसा सारखे वागले आणि बोललेसुद्धा पाहिजे असेही चिंतामणी दादा जगताप यांनी सांगितले.
