करमाळा

एकच ध्यास – प्रभागाचा करमाळा शहराचा सर्वांगीण विकास : सचिन गायकवाड

करमाळा प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक तीनच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन निवडून आल्यानंतर विकासकामांना गती देण्यात येत असल्याची माहिती नगरसेविका निर्मला गायकवाड यांचे चिरंजीव  सचिन गायकवाड यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरीलसु रक्षा गेट खराब अवस्थेत असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यानुसार सचिन गायकवाड यांनी पुढाकार घेत सुरक्षा गेटची दुरुस्ती करून काम पूर्ण केले. तसेच पुतळ्यासमोरील नाल्याची स्वच्छताही करण्यात आली आहे.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपच्या नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी प्रभागातील स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले आहे. त्यानुसार प्रभागातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सर्वसामान्य जनतेने सामाजिक कामाच्या जोरावर विश्वास ठेवून निवडून दिले असल्याने, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व इतर विकासकामांकडे विशेष लक्ष देऊन जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सचिन गायकवाड यांनी सांगितले. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार काम सुरू असून, प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!