Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी डॉ. अभिमन्यू माने यांची नियुक्ती*

*
करमाळा, प्रतिनिधी 
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. अभिमन्यू माने यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने विद्या विकास मंडळाच्या वतीने डॉ. माने तसेच कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी संभाजीराव किर्दाक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे, सहसचिव मा. विक्रमसिंह सूर्यवंशी व अध्यक्ष मा. मिलिंद फंड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मा. घुमरे म्हणाले की, डॉ. माने हे महाविद्यालयाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम व योग्य व्यक्तिमत्त्व असून संस्थेबद्दलची त्यांची निष्ठा उल्लेखनीय आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष मा. मिलिंद फंड यांनी डॉ. माने यांची प्रशंसा करताना ते प्रशासन, संस्था व कर्मचारी यांच्यात उत्कृष्ट समन्वय साधतील, असा विश्वास व्यक्त केला.
नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी आपल्या मनोगतात संस्थेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. माजी प्राचार्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.याच कार्यक्रमात संभाजीराव किर्दाक यांची कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर करून त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. नितीन तळपाडे यांनी केली. प्रा. मुन्नेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!