करमाळा

करमाळा नगरपालिकेत निवडणूकीतील विजयाबद्दल सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांचा सत्कार विकासासाठी सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन

*
करमाळा प्रतिनिधी —
करमाळा नगरपालिकेत निवडणूकीतील विजयाबद्दल सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांचा सत्कार विकासासाठी सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन*
करमाळा प्रतिनिधी —
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या निवासस्थानी सावंत गटाचे नेते सुनील (बापू) सावंत यांचा करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विजय मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मा. गोरे यांनी सुनील सावंत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य व पाठबळ देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या सत्कार समारंभास नगरसेवक दादासाहेब इंदलकर तसेच सोलापूर पश्चिम जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांची उपस्थिती होती. करमाळा शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.हाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या निवासस्थानी सावंत गटाचे नेते सुनील (बापू) सावंत यांचा करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विजय मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मा. गोरे यांनी सुनील सावंत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य व पाठबळ देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या सत्कार समारंभास नगरसेवक दादासाहेब इंदलकर तसेच सोलापूर पश्चिम जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांची उपस्थिती होती. करमाळा शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!