वाॅचमेकर ते यशस्वी उद्योजक रईस एजन्सीचे मालक अल्लाउद्दीन शेख यांची यशोगाथा*
रईस एजन्सीचे मालक अल्लाउद्दीन शेख यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये वडवळ ता. मोहोळ जि.सोलापुर येथे झाला. आई-वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरची परिस्थिती अत्यंत बिकट बेताचीच असल्याने दिवसभर मोलमजुरी करायची उत्पन्न कमी खायची तोंड जास्त दोन भाऊ कुटुंब मोठे असल्याने अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाची आवड होती.परंतु अशा परिस्थितीत खाण्याची आबाळ व शिक्षणाची आबाळ होत होती.
अल्लाउद्दीन शिकला तर त्यांच्या कुटुंबाचा तरी उत्कर्ष होईल या भावनेतुन त्यांची मावस बहिण जरीना सय्यदअली मुजावर यांनी भाऊ अल्लाउद्दीन यांची हुशारी पाहून त्यांला त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे करून स्वावंलबी जीवन जगण्यासाठी शिक्षणासाठी करमाळा येथे आणले. करमाळ्यामध्ये आल्यानंतर त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण चालू असतानाच सासरे धर्मगुरू मौलाना हाजी सय्यद अली मुजावर यांनी त्यांच्या रईस वॉच कंपनी या दुकानांमध्ये मेहुणा अल्लाउद्दीन शेख याला घड्याळाचे रिपेंअरींग काम शिकवले. घड्याळाचे काम शिकत बी .ए.पर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे पुर्ण केले.
अल्लाउद्दीन यांना स्वतःच्या पायावर उभा करून आपल्या मुलीशी विवाह लावण्याचे ठरवले.आताच्या समाजात मुलगा काय करतो हे हे लोक बोलतील म्हणून सासरे मौलाना सय्यद मुजावर व बहीण जरीना हिने 2005 साली भाडे तत्त्वावर जागा घेऊन 35 हजार रुपये भांडवल देऊन दुकान टाकून दिले. त्यानंतर आपली मुलगी नाजनीन हिच्याशी त्यांचा विवाह केला. लग्न झाल्यानंतर नाजनीन यांच्या पायगुणांने व खंबीर साथीमुळे आपल्या व्यवसायामध्ये दुकानांमध्ये ग्राहकांशी विनम्र व सेवा दिल्याने रईस एजन्सी या नावाने करमाळा शहरातच नव्हे तर तालुक्यामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. घड्याळ दुरुस्ती करत असताना आपला स्वतःचा व्यवसाय असावा ही मनामध्ये भावना असल्याने जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची तयारी असल्यामुळे अल्लाउद्दीन शेख यांनी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊनही आपली बहीण जरीना , सासरे मौलाना सय्यद अली मुजावर यांच्या सहकार्याने व आशीर्वादाने मोठे यश मिळवले आहे. रईस एजन्सी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये ग्राहकांना गृहपयोगी वस्तूची विक्री करत जोड व्यवसाय म्हणून टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा म्हणजे व्यवसाय जोडधंदा म्हणून करीत आहेत. त्यांच्याकडे सध्या तीन गाड्या असून यामध्ये क्रुझर, स्कॉर्पिओ, ईरटीका, या गाड्या आहेत. वाहतूकचा व्यवसाय इमाने इतबारे करीत असून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांना रोजगार देण्याची काम त्यांनी केले आहे. त्यांना शेतीची विशेष आवड असून वडिलोपार्जित वीस एकर शेती असून वडील पैगंबर शेख व आई छगनबी शेख यांच्या आशीर्वादाने आधुनिक पद्धतीने शेती करून कुटुंबाला स्वावलंबी व समर्थ करण्याचे काम त्यांनी केले आहे. दादासाहेब शेख व जमालभाई शेख हे त्यांना दोन भाऊ असून त्यांचे अल्लाउद्दीन वर विशेष प्रेम असून अल्लाउद्दीन शेख यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजची तरुण युवापुढी म्हणते की धंदा आपल्याला परवडत नाही. धंदा आपले काम नाही कुठेतरी नोकरी करून सुरक्षित जीवन जगलेले बरे अशी भावना शिकलेल्या युवा तरुणांमध्ये वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले जन्मगाव सोडून मावस बहीण जरीना यांच्याकडे राहुन बाहेर गावी येऊन सासरे व बहिणीच्या सहकार्याने प्रेमाने लोकांचे मने जिंकत माणुसकीची एक नाते निर्माण करून अल्लाउद्दीन शेख यांनी एक यशस्वी व्यावसायिक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांचे सासरे हाजी सय्यदअली मुजावर हे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत.त्यांनी जामा मस्जिद मध्ये त्यांनी 25 वर्ष मुस्लिम धर्मगुरु मौलाना म्हणून प्रामाणिकपणे काम केले आहे.सध्या ते आयेशा मस्जिद नालबंदनगर मौलाना म्हणुन काम करीत आहेत. अल्लाउद्दीन शेख हे कौटुंबिक जीवनामध्ये सुखी संपन्न आयुष्य जगत असून त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. थोरली मुलगी फराह दुसरा, मुलगा फैजान तिसरी मुलगी तैहनियत ही तीन आपत्ते असून थोरली मुलगी फराह ही अकरावीमध्ये इंजिनिअरिंगला शिकत आहे तर मुलगा फैजान नववीमध्ये तर तिसरी मुलगी तैहनियत सातवी मध्ये शिकत आहे मुलगा फैजानच्या जन्मानंतर 2008 साली स्वतःच्या मालकीची जागा घेऊन स्वतःच्या मालकीचे रईस एजन्सी नावाने इलेक्ट्रॉनिक दुकान सुरू केले होते. हे काम करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जोडधंदा म्हणून टुर्स ट्रॅव्हलचा व्यवसाय करत या व्यवसायामध्ये त्यांनी भरघोस यश मिळवले आहे. त्यांच्या मेव्हण्याचे नाव असून रईस असुन या नावाचा वारसा त्यांनी यशस्वीपणे चालवला आहे .त्यांच्या दुकानांमध्ये तीन ड्रायव्हर व चार कामगार अशा सात लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचे काम अल्लाउद्दीन शेख करीत आहेत. या व्यवसायामध्ये त्यांना कोणीही गुरु नाही परिस्थितीने निरीक्षण करून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला आहे. लोकांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपली वेगळेपण सिद्ध करून ग्राहकांना विनम्र तत्पर व विश्वासू सेवा देऊन व्यवसायात भरारी घेतली आहे. अल्लादिन शेख यांचा जन्म श्री. नागनाथ वडवळ येथील असून नागनाथावर त्यांची विशेष श्रद्धा आहे. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात नागनाथ यांचा आशीर्वाद घेऊनच करीत असल्याचे त्यांनी सांगितले .वास्तविक मुस्लिम समाजामध्ये कुठेतरी नोकरी छोटा-मोठा उद्योग करून उदरनिर्वाह करणे एवढ्याच या लोकांच्या अपेक्षा असताना आपल्या विचाराने आपल्या बहिणी व सासऱ्याच्या सहकार्याने स्वतःची वेगळी ध्येय ठेवून आपले स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. त्यांच्या टुरिस्टच्या व्यवसायामध्ये आसिफभाई, सलिमभाई राहुल डोलारे आकाश,यांनी मोलाची साथ दिलेली आहे. रईस एजन्सी या शाॅपमध्ये कामगार पंकज गणगे, प्रताप शिंदे, माऊली तरंगे,यांनी सहकार्य केल्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करण्याचे काम आपण केले असल्याचे अल्लाउद्दीन शेख यांनी सांगितले. आहे. अल्लावर त्यांची विशेष श्रद्धा आहे. असे असतानाही सर्व धर्माची तत्वे मान्य करून माणूसिकी हाच खरा धर्म पाळत माणुसकीचे प्रेमाचे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा घड्याळ दुरुस्ती करणारा कामगार ते एका इलेक्ट्रॉनिक दुकानाचा मालक असा अलाउद्दीन शेख यांचा प्रवास युवा पिढीला व समाजाला नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा.
