हिवरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी बागल पाटील गटातील कार्यकर्त्यांचा संजयमामा शिंदे गटात प्रवेश
करमाळा प्रतिनिधी हिवरे तालुका करमाळा येथील बागल गट व पाटील गटातील माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी विकास प्रिय आमदार माननीय संजय मामा शिंदे यांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत काका सरडे फिसरे गावचे युवक नेते उद्योजक भरत भाऊ अवताडे माजी सरपंच बाळासाहेब जगदाळे तानाजी बापू झोळ मानसिंग खंडागळे सुभाष हानपुडे उपस्थित होते.हिवरे गावचे माजी सरपंच उमेश मगर ग्रामपंचायत सदस्य हरी पाटील पांडुरंग ढोले ग्रामपंचायत सदस्य बापू ओहोळ यांच्याबरोबर सुभाष फरतडे शशिकांत मगर लक्ष्मण शिंदे परशुराम माने अमित काळे भीमराव मगर नवनाथ मगर रोहिदास शिंदे इंद्रजीत पाटील रावसाहेब फरतडे अनिल मगर पिंटु डौलै नाना मगर कैलास खाडे बबन फरतडे तात्या खंडागळे बापू लोहार कल्याण विटुकडे रघुनाथमामा मगर या कार्यकर्त्यांनी संजय मामा शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी मामांच्या गटातील प्रमुख धनंजय फडतरे जयराम शिंदे अंकुश काळे नितीन फरतडे उपस्थित होते. उमेश मगर यांनी प्रवेश करण्याचे कारण म्हणजे मामाचा विकासात्मक दृष्टिकोन नागनाथ महाराज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कोळगाव सबस्टेशनचे नादुरुस्त रोहित्र दुरूस्त करून मिळावे अशी त्यांची मागणी असल्याने ती कामे मामाच मार्गी लावतील असा विश्वास असल्याने संजय मामा शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
