शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचा समावेश पिक विमा योजनेत करण्याची ॲड अजित विघ्ने यांची मागणी
केत्तूर प्रतिनिधी अभय माने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक नुकसान होते अशा शेतकऱ्यांना संकट काळात दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या ऊस पिकाचा समावेश नाही नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. संकटकाळी शेतकऱ्यांना आधार ठरणार्या योजनेत अनेक पिकांचा आहे.यापुढे ऊस पिकाचाही समावेश करावा अशी मागणी के त्तूर (ता.करमाळा ) येथील अँड. अजित विघ्ने यांनी केली आहे.
नैसर्गिक आपत्ती तसेच बहुतेक वेळा विजेच्या शॉट सर्किट होऊन ऊस जळतो अशा संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 मध्ये सुरू केली आहे . खरीप पिकासाठी दोन टक्के व रब्बी पिकासाठी पाच टक्के हफ्ता भरावा लागतो या योजनेत कर्जदार बिगर कर्जदार शेतकरीही सहभागी होऊ शकतात.नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी देखील या ऊस पिकाला धोका आहे मात्र या पिकाचा समावेश पिक विमा योजनेत केलेला नाही ऊस पिकाचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी जोर धरत आहे.
