काॅग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज काँग्रेस आय पक्षाचे वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून करण्यात आली .यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक आदोंलनानी भारताला स्वातंत्र्य मिळून दिले सन 1930 साली इंग्रजांनी लादलेल्या मिठा वरील करा विरोधात आंदोलन केले तर 1942 साली इंग्रजां विरोधात भारत छोडो आंदोलन केले महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा चा पुरस्कार केला अशा या राष्ट्रपिता ची जयंती संपूर्ण भारतभर साजरी केली जाते असे ते यावेळी म्हणाले
यावेळी फारूक जमादार .साजीद बेग. संभाजी गायकवाड. पांडुरंग सावंत. कलीम शेख आसिफ बेग मैनुद्दीन शेख महेश भागवत दत्तात्रय कांबळे अंगद झिंजाडे रविद्र सुरवसे सचिन सामसे सलीम शेख दिनेश सावंत पप्पु रंधवे आदींनी जयंती साजरी केली.
