करमाळासामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केलेल्या कोश्यारी यांच्या वक्तव्याचा करमाळयातील शिवप्रेमीकडुन निषेध करुन पुतळयाचे दहन

करमाळा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल केलेले विधान आम्ही कदापी सहन करणार नाही. कोश्यारी हे सतत महापुरुष यांच्याबदल चुकीचे वक्तव्य करून वाद निर्माण करत आहेत श त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संतप्त शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. करमाळा येथील सुभाष चौकात सर्व शिवप्रेमींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केल्याने सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करत मंगळवारी (ता. २२) शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
करमाळ्यातील शिवप्रेमी विविध संघटना व पक्षांचे कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते. शिवप्रेमींनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कोश्यारी यांचा तयार केलेला प्रतीकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले. दरम्यान काही शिवप्रेमींनी मनोगत व्यक्त करत कोश्यारींनी केलेल्या विधानाचा समाचार घेत त्यांनी राजनामा देऊन शिवप्रेमीच्या भावनाची कदर करण्याचे आवाहन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group