आनंदऋषीजी नेत्रालय व श्री कमलादेवी ऑप्टिकल्स करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
करमाळा प्रतिनिधी आनंदऋषीजी नेत्रालाय, आणि श्री कमलादेवी ऑप्टिकल्स, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबिर २० नोव्हेंबर रोजी रविवारी आयोजित करण्यात आले होते तरी या शिबिरात एकुण 97 लोकांची तपासणी झाली व त्यापैकी 45 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आनंदऋषिजी नेत्रालाय, अहमदनगर येथे रवाना करण्यात आले आहे. या रुग्णालयात प्रत्येक रुग्णाची वैयक्तीक काळजी घेतली जाते व सर्व नेत्र समस्यांवर माफक दरात उपचार केले जातात. लाभ घेतलेल्या सर्वांचे मनापासून आभार. तसेच पुढिल शिबिर तिसरा रविवार म्हणजेच दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केलेले आहे तरी गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आनंदऋषिजी नेत्रालया चे प्रमुख आनंद छाजेड यांनी केले आहे.
