केम, जेऊर नंतर आता पारेवाडी ला सुद्धा एक एक्स्प्रेस गाडीला थांबा मिळवुन देणारच असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ठोस आश्वासन- ॲॅड. अजित विघ्ने यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम आणि जेऊर येथील रेल्वे प्रवाशांचे मागण्यांचा विचार करून त्या ठिकाणी कोनार्क एक्स्प्रेस गाडीला थांबा दिलेला असुन, आपण लवकरच पारेवाडी रेल्वे स्थानकावर देखिल एका एक्सप्रेस गाडीला थांबवणारच असले बाबतचे ठोस आश्वासन खासदार रणजित सिंह नाईक- निंबाळकर यांनी फोनवरून अॅड. अजित विघ्ने यांना दिले असले बाबतची माहीती दिली आहे. याबाबत खासदार महोदयांना आमदार. संजयमामा शिंदे व शिवसेना नेते सुर्यकांत ( भाऊ) पाटील यांनी देखिल खासदार यांना पारेवाडी स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा देणे बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. पारेवाडी रेल्वे स्थानक व स्थानकाचे शेजारील ३० गावातुन एक्सप्रेस थांब्याची मागणी होत असुन मध्यंतरी भव्य मोर्चा देखिल झालेला आहे. या स्टेशनपासुन जेऊर रेल्वे स्टेशन ला जायला तब्बल२७ किमी चा बायरोड प्रवास करावा लागतोय तसेच या स्टेशनवर ट्रायल बेसीस वर तरी गाडीला थांबा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. येथील प्रवाशांची मागणी योग्य असुन , मी पारेवाडी स्टेशनवर एका एकसप्रेस गाडीला थांबा देणारच असलेची माहिती खासदार साहेबांनी दिली आहे. आज खासदार करमाळा , माढा तालुक्याचे दौर्यावर असुन आश्वासनची पुर्तता लवकर होइल अशी अपेक्षा पारेवाडी रेल्वे स्थानका वरील प्रवाशांनी केलेली आहे.
