पारेवाडी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील महत्वाचे प्रश्नांबाबत खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना निवेदन
पारेवाडी प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसह पश्चिम भागातील अनेक महत्वपुर्ण विकास कामांच्या संदर्भात केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने , हिंगणीचे सरपंच हनुमंत पाटील व शिष्टमंडळाने आज करमाळा येथे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली.. याप्रसंगी खासदारांनी आपले विभागातील प्रश्न सोडविण्याचे साठी पाठपुरावा करू व प्रश्न मार्गी लावु असे सांगितले यावेळी भाजपाचे युवक नेते गणेशजी चिवटे, युवा नेते शंभुराजे जगताप, जगदीश आग्रवाल, दिपक चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.
