करमाळा कुर्डूवाडी एसटी गौंडरे नेरले मार्गे सुरू व्हावी-औदुंबरराजे भोसले
करमाळा प्रतिनिधी करमाळा कुर्डूवाडी एसटी गौंडरे व नेरले मार्गे सुरू व्हावी अशी मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे व गौंडरे साडेतीन हजार लोकसंख्येचे आहे. गौंडरे गावात दोन विद्यालय व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. सीना कोळेगाव धरण जवळच आहे.नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी जातात तसेच आवाटी सालसे,निमगाव, कोळगाव,हिसरे ,हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी गौंडरे येथे येतात या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व नागरिकांना वनकुर्डवाडी येथे रेल्वेने पुणे मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी येणे जाण्यासाठी एसटीची सोय नसल्यामुळे अनेक कामे थांबतात. त्यामुळे करमाळा कुर्डूवाडी गाडी फिसरे,हिसरे, कोळगाव, निमगाव,गौंडरे,नेरले, वरकुटे, कव्हे,बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळ्याला जावी अशी मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी जिल्हा नियंत्रक साहेब महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे गौंडरे व नेरले ग्रामपंचायत ठराव व छत्रपती संभाजी महाराज विद्यालय गौंडरे यांच्या पत्रासोबत केली आहे.
