खांबेवाडी श्री संत सदगुरू बाळूमामा यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी श्री क्षेत्र खांबेवाडी येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय शेळके वस्ती खांबेवाडी श्री संत सदगुरू बाळूमामा यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती ह भ प श्री धनंजय शेळके महाराज यांनी दिली मंगळवारी सकाळी पहाटे पाच वाजता श्री ला अभिषेक होईल संध्याकाळी साडेसहा ते साडेसात हरिपाठ होईल साडेसात ते साडेआठ प्रवचन होईल साडेआठ ते नऊ श्री संत सद्गुरू बाळुमामा यांची आरती होईल त्यानंतर महाप्रसाद होईल दहा ते बारा ह भ प गायन कोकिळा रामायणाचार्य ज्ञानेश्वरी दीदी सुपनवर यांचे हरिकीर्तन होईल तरी करमाळा व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रवण भक्तीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



