Friday, April 25, 2025
Latest:
करमाळाकृषी

शेतकऱ्यांना हवामानाचा अचुक अंदाज सांगून त्यांची जनजागृती करण्याचे पंजाबराव डक यांचे मोलाचे योगदान -दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री पंजाबराव डक ऑगस्ट यांचे बागल कृषी महोत्सव 2023 अंतर्गत 13 मार्च 2023 लोकनेते दिगंबर मामा बागल यांच्या जयंतीच्या दिवशी सकाळच्या सत्रात मुख्य व्यासपीठावरती अभ्यासपूर्ण व्याख्यान झालं प्रारंभी पंजाबराव ढग यांचा आगमन कृषी नगरीमध्ये झाल्यानंतर लोकनेते दिगंबराजी बागल मामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर पंजाबराव ढग आणि सर्व मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाला सदिच्छा भेट देऊन अभिप्राय दिला आहे यावेळी पंजाबराव डक यांचा सन्मान विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक आणि स्वागत मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि स्वागताध्यक्ष दिग्विजयजी बागल यांनी केले आपल्या भाषणात त्यांनी पंजाबराव डक यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे शेतकरी जागृत होत असून त्याप्रमाणे आणि तुम्ही सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे पिकांचे नियोजन करत आहे आपल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होतो आहे भविष्यात देखील आपण त्याच पद्धतीने अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांची जनजागृती करावी सोशल मीडियावर आपले हजारो फॉलॉवर्स आहेत त्यामुळे आपण करत असलेली ही जनजागृती निश्चितपणे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे या पुढच्याही काळात असेच अचूक अंदाज आपण द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी करमाळा तालुक्याचे माजी आमदार शामलताई बागल परभणीच्या माजी आमदार मीराताई रेंगे पाटील साखर संघाच्या संचालिका रश्मीदीदी बागल माजी नगर सेवक राहुल दादा जगताप मार्केट कमिटीचे उपसभापती चिंतामणी दादा जगताप , प्राचार्य एल बी पाटील सर प्राचार्य मिलिंद फंड सर माजी प्राचार्य नागेश माने शेतकरी बांधव हे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी आज सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आणि व्याख्यानाचे सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले आभार चिंतामणी दादा जगताप यांना मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group