करमाळा

उजनी जलाशय पाण्याची वाढ झाल्यामुळे आठ तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी -प्राध्यापक शिवाजीराव बंडगर

करमाळा प्रतिनिधी – सन 1977 पासून आज पर्यंत 47 वर्षात सर्वात जास्त निचांकी पातळी 59.99 % गाठलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी 7 जून पासून आज अखेर तेवीस दिवसात सव्वा दोन मीटर ने वाढली असून त्यामुळे उजनी जलाशय काठावरील शेतकर्यांना दिलासा मिळाला असून पातळी खालावल्याने हतबल झालेला,मेटाकुटीस आलेला शेतकरी आता आठ तास वीज पुरवठा चालू करण्याची मागणी करू लागला आहे असे मत प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर यांनी व्यक्त केले आहे.

गत वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे धरण केवळ 60.66 % इतकेच भरले. त्यातच कालवा सल्लागार समितीच्या अयोग्य व ढिसाळ नियोजनामुळे बेमालूमपणे पाणी कॅनाल व नदीतून सोडण्यात आले. उजनी जलाशय काठावरील शेतकरी यास विरोध करत असताना आजी माजी लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने उजनीच्या पाण्याच्या ढिसाळ नियोजनाला तीव्र विरोध केला . वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी रेटून धरली. शासनातले मंत्री, जिल्हाधिकारी, कालवा सल्लागार समिती, याना निवेदने देऊन चर्चा घडवून आणल्या. प्रसंगी आंदोलन ही केले. निकराचा लढा उभारला .उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचा अंकुश राहिला म्हणून तरी पाणी नियोजनाच्या बेबंद शाही ला आळा बसला अन्यथा आणखीन पाणी खाली गेले असते . मात्र कुणालाच पाझर फुटला नाही . ना पाण्याचे नियोजन झाले ना वरच्या धरणातून पाणी सोडले . व्हायचे तेच झाले . पाणी पातळी निचांकीला गेली. वीज कपात आठ तासावरून सहा तास करण्यात आली.

मात्र आता उजनी पाणलोट क्षेत्रात पाऊस समाधानकारक झाल्याने तेवीस दिवसात 18.54 % इतके पाणी वाढले असून वजा 41.54 % इतका पाणी साठा झाला आहे. यामुळे उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करण्यात यावा अशी मागणी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group