ज्युनिअर थ्रोबॉल राज्य स्पर्धेत मुंबई उपनगरला दुहेरी मुकुट तर सोलापूर मुली तृतीय
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर व श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 28 वि ज्युनियर थ्रोबॉल राज्य अजिंक्यपद (मुले व मुली) स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ विलासराव घुमरे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या शुभहस्ते व डॉ.अमोल शिंदे प्राचार्य लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य थ्रोबॉल संघटनेचे सचिव सुनील इंगोले खजिनदार विनोद गेडाम , थ्रोबॉल असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे ,उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी , क्रीडाधिकारी सत्येन जाधव ,नाईकवाडी , महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशनचे संचालक राजेंद्र मागाडे , डॉ. सतीश देवकर प्राचार्य लोकमंगल विज्ञान व उद्योजक्ता महाविद्यालय, योगेश गायकवाड प्राचार्य आयटीआय विभाग मुंबईचे जिल्हाध्यक्ष निर्भवणे , प्रशांत राणे व सोलापूरचे जिल्हा सचिव मारुती घोडके हे उपस्थित होते
या स्पर्धेसाठी पंच म्हणून राज्य व राष्ट्रीय पंच गिरीराज गुप्ता यवतमाळ, रितेश गुलबासे नागपूर, बाळकृष्ण कात्रे पुणे, विठ्ठल सरवदे, संतोष पाटील ,कमलेश दळवी ,राज मल्हार जाधव ,प्रशांत वाघमारे सोलापूर यांनी काम पाहिले
या स्पर्धेच्या आयोजनासाठी थ्रोबॉल असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे , उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी, सचिव मारुती घोडके ,राजाराम शितोळे ,दत्तात्रय पाटील ,प्रमोद चुंगे, गंगाराम घोडके, प्रशांत राणे ,धर्मराज कट्टीमणी, सिद्धेश्वर घुगरे , उमेश नेवाळे, श्रीधर गायकवाड, रवींद्र डोंबाळे ,नागप्पा मैंदर्गी, ओंकार पुजारी, हर्ष लाहोटी ,ओम अंडेली, विनायक माळी ,नागराज गुडदोर व लोकमंगल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे परिश्रम घेत आहेत
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष खेंडे, प्रास्ताविक सचिव मारुती घोडके व आभार संचालक राजाराम शितोळे यांनी केले
विजेत्या खेळाडूंसोबत विलासराव घुमरे ,डॉ. अमोल शिंदे , सुनील इंगोले , प्रवीण गेडाम, राजेंद्र माघाडे ,सत्येन जाधव ,नाईकवाडी , प्रा.संतोष गवळी, प्रशांत राणे , प्रा.संतोष खेंडे ,मारुती घोडके, राजाराम शितोळे गंगाराम घोडके त्तात्रय पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते
अंतिम निकाल
मुले प्रथम सांगली
द्वितीय मुंबई उपनगर
तृतीय वाशिम
मुली
प्रथम मुंबई उपनगर
द्वितीय भंडारा
तृतीय सोलापूर