दत्तकला शिक्षण संस्थेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेत भारताचा ७५वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी उत्साहात पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास झोळसर, उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिव सौ. माया झोळ मॅडम , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. विशाल बाबर सर,सर्व विभागांचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची भाषणे, साहसी खेळ, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. तसेच दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका प्रा. वर्षा झोळ यांचे भाषण झाले.
या प्रंसगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थाध्यक्ष श्री. रामदास झोळ सरांनी भारताच्या बदलत्या प्रगतीचा आढावा घेतला, एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना देशासमोर असणाऱ्या आव्हानांवर त्यांनी वास्तवदर्शी भाष्य केले. या वेळी शैक्षणिक क्षेत्रात बदलत्या शैक्षणिक धोरणा नुसार शिक्षकांची भूमिका काय असावी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.. अशा रीतीने संस्थेत भारताचा ७५वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिव सौ माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.विशाल बाबर सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले व संपूर्ण कार्यक्रम आनंदात, उत्साहात संपन्न झाला.
