Thursday, April 24, 2025
Latest:
Uncategorized

बागल गटाचा सच्चा नेता बप्पा मनाला चटका लावुन गेले मकाईचे माजी संचालक संतोष देशमुख यांचे निधन

 

करमाळा प्रतिनिधी,

राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष बागल गटाचे समर्थक तसेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष आप्पा देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू व हसतमुख अशा स्वभावाचे संतोष देशमुख हे अचानक निघून गेल्याने पूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे. बागलगटाला विजय मिळावा यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू होते. त्यात प्रमुख कामगिरी आप्पा निभावत होते. वांगी परिसरात उत्कृष्ट समाजकार्य करत असलेला नेता म्हणून ओळख निर्माण केलेले संतोष बप्पा देशमुख हे अचानक निघून जातील असे वाटत नसताना झालेली घटना मनाला चटका लावून जाणारी आहे.
जवळपास मकाईत बागल गटाचे एकतर्फी सत्ता आलेली असताना ज्या सत्तेसाठी त्यांनी प्रयत्न केले याचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच त्यांची ही एक्झिट नक्कीच सर्वांना मोठा झटका देणारी ठरणार आहे. हसतमुख प्रेमळ मनमिळाऊ कायम प्रत्येकाच्या हृदयात घर करणाऱ्या बप्पांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.आमचे सहकारी बंधू,मकाई स.सा.का. चे संचालक मा. संतोष उर्फ बारिकराव देशमुख यांचे आज आकस्मात दुःखद निधन झाले.एका अतिशय धाडसी,कार्यक्षम युवक सहका-यास आम्ही मुकलो आहोत.देशमुख कुटूंबियांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
स्व.बप्पांच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना🙏  सौ.रश्मी दिदी बागल कोलते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group