Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

मकाई निवडणुकीत १३ अपात्र उमेदवाराचे अपिल प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे दाखल – प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या १३ उमेदवारांनी सोलापूर येथील प्रादेशिक सह संचालक (साखर) यांच्याकडे अपील दाखल केले असल्याची माहिती, मकाई बचावचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाच्याविरुद्ध मकाई बचाव समितीच्या माध्यमातून प्रा. झोळ हे निवडणुकीत उतरले. मात्र त्यांचा व मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या सदस्या सविताराजे राजेभोसले यांचाही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवला आहे. तीन वर्ष ऊस गाळप केला नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या निकालाविरुद्ध अपील केले असल्याचे प्रा. झोळ यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group