करमाळा वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड दत्तात्रय सोनवणे उपाध्यक्षपदी ॲड जयदीप देवकर यांची निवड
*करमाळा प्रतिनिधी
करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष ॲड. विकास जरांडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडून त्यामध्ये नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. जयदीप देवकर, सचिव म्हणून ॲड. विनोद चौधरी, सहसचिव म्हणून ॲड. सुनील घोलप यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष हे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आहेत. यावेळी करमाळा वकील संघाचे बहुसंख्यविधीज्ञ हजर होते. या निवडीनंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. पी. लुणावत, ॲड. एस. पी. रोकडे, ॲड. भाऊसाहेब वाघमोडे, ॲड.बाबुराव हिरडे, ॲड. ए. एस. गिरंजे, ॲड. कमलाकर वीर, ॲड. राजेश दिवाण, ॲड. सविता शिंदे त्याचबरोबर उपस्थित विधिज्ञानी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
