स्वयंअर्थ सहाय्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेंना वरिष्ठ पातळीवरून आवश्यक ते सहकार्य करणार – अध्यक्ष जयप्रकाश बिले
करमाळा प्रतिनिधी
स्वयंअर्थ सहाय्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेंना वरिष्ठ पातळीवरून आवश्यक ते सहकार्य करणार अशी माहिती नुतन अध्यक्ष जयप्रकाश बिले यांनी दिली आहे.
दिं.6 वार वेळ दुपारी 4 वाजता बिले पब्लिक स्कूल झरे, करमाळा जि. सोलापूर येथे करमाळा तालुक्यातील स्वयंअर्थ सहाय्य इंग्रजी माध्यमाच्या संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. सदर सभेस खालील संस्था चालक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अ.क्र. शाळेचे नाव पद गाव सही,जयप्रकाश बिले पब्लीक स्कूल अध्यक्ष झरे, स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल अध्यक्ष रोशेवाडी,गुरुकूल पब्लीक स्कूल अध्यक्ष पांडे ,इरा पब्लिक स्कूल अध्यक्ष चिखलठाण,डी. जी. पाटील हायस्कूल अध्यक्ष संगोबा,जिजाऊ ज्ञान मंदीर अध्यक्ष जातेगाव ,लिटल एंजल स्कूल अध्यक्ष जेऊर,अटल ज्ञान प्रबोधिनी अध्यक्ष जेऊर, न्यू साई समर्थ पब्लिक स्कूल अध्यक्ष जिंती ,शंकरराव भांगे प्रा. विद्यालय अध्यक्ष कंदर ,लोक कल्याण इंग्लिश स्कूल अध्यक्ष कंदर ,नवभारत इंग्लिश स्कूल अध्यक्ष करमाळा, नोबेल इंग्लिश स्कूल अध्यक्ष करमाळा, लिड स्कूल अध्यक्ष करमाळा
,भाऊसाहेब झाडबुके अध्यक्ष करमाळा,राणा नोबेल इ. स्कूल अध्यक्ष करमाळा,कृष्णाई इंटरनॅशनल इ.मि. स्कूल अध्यक्ष कात्रज टाकळी ,शिवकिर्ती इंग्लिश स्कूल अध्यक्ष केम, मंगलदिप पब्लिक स्कूल अध्यक्ष केम ,दत्तकला आयडियल स्कूल अध्यक्ष केल्तूर ,डॉ. दुरंदे गुरुकुल अध्यक्ष कोर्टी,गुटाळ मॉडन प्रशाला अध्यक्ष पांगरे ,अभिनव पब्लिक स्कूल अध्यक्ष वाशिंबे,कुलस्वामी प्रायमरी स्कूल अध्यक्ष झरे आदी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव विश्वस्त उपस्थित होते.
पुढे बोलताना नुतन अध्यक्ष जयप्रकाश बिले म्हणाले की
स्वयं अर्थ सहाय्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या खालील प्रश्नांविषयी सखोल चर्चा करण्यात आली. सन. 22-23 अखेर पर्यंत 25% RTE ची फी विद्यार्थ्यांची शासनाकडून दिली जात होती. सन 24-25 पासून सदरची फी शासनाने देण्या- विषयी नकारात्मक भूमिका घेतलेली आहे. यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालवणे कठीण जाणार आहे. तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविदयालयांना खासदार व आमदार, राज्य सभेचे खासदार, विधान परिषदेचे आमदार यांच्या कडून विकास कामासाठी फंड (निधी) दिला जातो तो आम्हाला ही मिळावा.शिष्यवृत्ती लागु करावी, सुंदर शाळा योजना स्वतंत्र बक्षीस वितरण करावे, तसेच क्रिडा खात्याकडून संस्थांना मैदान विकासासाठी व खेळाच्या साहित्यासाठी अनुदान दिले जात नाही. तसेच शिक्षक मतदार संघातील मतदार यादीत स्वयं अर्थ शाळेत शिकविणाऱ्या शिक्षक, शिक्षिकेना मतदार म्हणून नोंदणी केली जात नाही ती नोंदणी करावी. इतर शाळेंना निधी मिळतो त्याच पध्दतीने स्वयंअर्थ शाळेंना ही मिळावा
वरील सर्व प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी तालुका स्तरावर करमाळा तालुका स्वयंअर्थ इंग्रजी माध्यम संस्था चालकांची संघटना स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.अध्यक्ष प्रा. जयप्रकाश कोडिंबा बिले सचिव जयंत रामचंद्र दळवी,विश्वस्त नितीन भोगे, संदिपान गुटाळ,आबा साळुंखे, डॉ. ब्रिजेस हरिश्चंद्र बारकुड, तानाजीराव निवृत्ती करचे वरील इतिवृत्त सर्वानुमते मंजुर करण्यात आले व संघटनेचा पत्र व्यवहार सचिव जयंत दळवी यांनी करावा व आवश्यक ते रेकॉर्ड तयार ठेवावे. असे सर्वानुमते ठरले आहे
…….
पुणे मतदार संघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे त्यांनी करमाळ्यात येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे त्यांच्या समवेत संघटनेच्या विविध समस्यांबाबत बैठक लवकरच लावण्यात येणार आहे.
