करमाळा

वैद्यकीय, कृषी, उच्च व तंत्र शिक्षणाच्या आरक्षण, शिष्यवृत्ती व प्रवेशाच्या धोरणाबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिले विविध समस्या सोडविण्यासाठी निवेदन

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची 17 जुन रोजी मुंबई येथे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेतली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली तसेच शिक्षण क्षेत्रातील काही अडचणी सोडविण्या साठी निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री साहेब यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निवेदनातील विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.असोसिएशन ऑफ सेल्या फायनान्स इन्स्टिटयुटस् ही राज्यसतरीय संघटना महाराष्ट्रातील विद्यार्माना संस्थांना भेडसावणाऱ्या विवीध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातुन आजपर्यंत अनेक प्रकारच्या शैक्षणिक समस्या सोडविष्यात यश आले आहे . यामध्ये प्रामुख्याने एमसीए अभ्यासक्रमाची कालमयांदा ३ व वर्षा ऐवजी दोन वर्षे करणे, औषधनिर्माणशास्त्र व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेशपात्रता शिखर संस्थांच्या पात्रतेप्रमाने कल्ले ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे करणे व ईडब्ल्यूएस च्या प्रथम वर्षाच्या रिक्त जागा दुसऱ्या वर्षाच्या लॅटरल एन्ट्रीमध्ये उपलब्ध करून देणे इ. चा समावेश आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व्या विविध प्रकारच्या तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश पूर्व परिक्षेच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. परंतु सदर प्रक्रियेदरम्यान अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना महाराष्ट्र राज्यातील संस्थाचालकांना / महाविद्यालयांना तसे विद्यार्थ्यांना तोंड थावे लागत आहे. त्यातील काही प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) महाराष्ट्र राज्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाचे धोरण हे कृषि, वैद्यकीय तसेव उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लागू करण्यात आलेले आहे तरी या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचे धोरणामध्ये एकसमानता असणे आवश्यक आहे.
२) महाराष्ट्र राज्यामध्ये शिष्यवृत्तीचे धोरण जातीनिहाय वेगवेगळे आहे. तरी यामध्ये एकसमानता असणे आवश्यक आहे.
३) वरील सर्व अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या वसतिगृह भत्त्यात सर्व जाती धर्मासाठी एकसमानता नाही तरी यामध्ये एकसमानता असणे आवश्यक आहे.
४) कृषि, वैद्यकीय तसेच उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मेरीट लिस्ट लागल्यानंतरची प्रवेश प्रक्रिया ही वेगवेगळी राबविली जाते, तरी सदर प्रवेश प्रक्रिया ही आपल्या शेजारील गोवा राज्याप्रमाणे वरील सर्व अभ्यासक्रमांसाठी एकसारखी राबविली जावी.
५) एकसमान पात्रता असणाऱ्या अभ्यासक्रमांना एकच सीईटी असावी.
६) शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची वाहतूक करणाऱ्या बसेस यांना एक समान टॅक्स असावा.
७) बरील सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक टास्क फोर्स नेमावा, ज्यामध्ये वरील संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी, संस्था प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा.अशा अनेक प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत आपण कृषि, वैद्यकीय, उच्च व तंत्रशिक्षक विभागांचे सचिव, संचालक तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, बहुजन कल्याण विभागांचे आयुक्त व संबंधित अधिकारी या सर्वांची एकत्रित बैठक आयोजित केली तर वरील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करता येईल तरी सदरबाबत आपण विशेष पुढाकार घेवून महाराष्ट्र राज्यातील सर्व संस्थाचालकांना व विद्यार्थ्यांना सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष प्रा रामदास झोळ सर यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!