करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाचे रस्ते, पुल, विविध बांधकामे यांना भरघोस निधी मंजूर करून आमदार. संजयमामा शिंदे यांनी गतिमान विकासाला चालना दिली.—- ॲड.अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनाचे पहील्याच दिवशी अर्थसंकल्पात करमाळा विधानसभा क्षेत्राचे रस्ते व बांधकाम विकासाकरीता महाराष्ट्र राज्य शासनाकडुन ६८ कोटी रुपये मंजुर करण्यात आलेले असुन, यासाठी आमदार. संजयमामा शिंदे यांनी आपली ताकद पणाला लावली. सदरचा मिळालेला निधी करमाळा तालुक्याचे विकासाला गतिमान करणारा असुन, आठ मंडल कार्यालये व वीस तलाठी कार्यलये याचे बांधकामांकरीता विशेष निधी प्राप्त झाला आहे. आजपर्यत याबाबत कोणीही दक्षता घेतलेली नव्हती, परंतु आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत केलेल्या सततच्या पाठपुराव्या मुळे लवकरच ही कार्यालये सुसज्ज होतील. तसेच करमाळा तालुक्यातील अनेक महत्वकांक्षी योगनांना मंजुरी मिळवुन कामे देखिल प्रगतिपथावर आहेत. पश्चिम भागातील असणारे युवक नेते ॲड. अजित विघ्ने यांना याबाबत अधिक माहीती विचारली असता त्यांनी सांगितले की, दोन वर्षाचा कोव्हीड चा काळ जाऊनही उर्वरीत दिवसांत विकासाचे व्हीजन पुर्णत्वाकडे नेहण्याचा संकल्प पुर्ण केला आहे.१) कोंढार चिंचोली -डिकसळ पुल -५५ कोटी,( काम चालु)२) कोर्टी ते पारेवाडी स्टेशन रस्ता -३ कोटी,3) पारेवाडी ते वाशिंबे( चव्हाण-गुंडगिरे वस्ती) रस्ता/ पुल-३.५ कोटी ४) केत्तुर नं-२ ते केत्तुर नं-१ विस्तारी करणासह ७.५ कोटी ५) सोगावं- वाशिंबे ते केत्तुर नं-१ रस्ता-५ ६) पोमलवाडी ते सावडी फाटा प्रजिमा-१२४ २.८५कोटी (टेंडर झाले आहे) ७) वाशिंबे ते टापरे चौक ते राजुरी ( काम पुर्ण) या रस्त्यांना मंजुरी व कामे प्रगती पथावर आहेत. या शिवाय पोमलवाडी ते जिंती, जिंती चौक ते कात्रज स्टेशन , कुंभारगाव ते दिवेगव्हाण, हिंगणी ते पारेवाडी स्टेशन, हिंगणी ते कुंभारगाव , विहाळ ते राजुरी, मांजरगाव ते कोर्टी या रस्त्यांसाठी निधी मंजुर करण्यासाठी पाठपुरावा चालु आहे. वस्तुतः हे सर्व रस्ते पश्चिम भागातील महत्वाचे रस्ते असुन आजपर्यंत कोंढार चिंचोली ते डिकसळ ब्रिटीश कालीन पुलाचे आयुष्य संपले आहे एवढेच ऐकत आलो परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमदार संजयमामा शिंदे यांचे कणखर नेतृत्वाची क्षमता या पुलाचे निधी मंजुरी साठी वेळोवेळी सिद्ध झाली आहे. करमाळा तालुक्यातील अन्य जिल्हा परिषद गटातील रस्त्यांना देखिल निधी प्राप्त झाला असुन, करमाळा तालुका १००% बागायत करणार हे आमदार संजयमामांचे शब्द लवकरच सत्यात साकारणार आहेत. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आमदार साहेबांनी सुचविलेल्या योजना , उपाय , आराखडा शासनाने स्विकारले असुन भरीव निधीची तरतुद होत आहे. दहीगाव, कुकडी प्रकल्प, कोळगाव योजना पाच वर्षात सक्षम पद्धतीने चालू असुन, नवीन वाशिंबे( रिटेवाडी) उपसा आणि केत्तुर नं-२ उपसा या योजनांचा प्रस्ताव मंजुरी च्या प्रतिक्षेत आहे. ज्यामुळे करमाळा तालुक्याचे उर्वरीत जिरायती क्षेत्र बागायती होणार आहे. करमाळा तालुक्यातील ११८ आणि माढा तील ३६ गावांचा समतोल विकास साधताना मामांनी गेल्या ३ वर्षात ( कोव्हीड २ वर्षे सोडून) मतदार संघासाठी विविध माध्यमातुन आणलेला निधी निश्चितच विकासाची गतिमानता वाढवणारा आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी पश्चिम भागातील अति महत्वाचे रस्ते/ पुला साठी भरघोस निधी मंजुर करून दिल्यामुळे जनता – जनार्दन बेहद खुष असुन, पश्चिम भागाचे विकासाला चालना मिळण्यासाठी आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी ही महत्वपुर्ण बाब आहे.
