करमाळा

जीवनात सोन्यासारखी माणसे जपल्याने भरत भाऊ आवताडे यांनी सुरु केलेल्या गुरूदत्त ज्वेलर्सचा सुवर्ण व्यवसाय नक्कीच भरारी घेईल – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी जीवनात सोन्यासारखी माणसे जपल्याने भरत भाऊ आवताडे यांनी गुरूदत्त ज्वेलर्सने सुरू सुवर्ण व्यवसाय नक्की भरारी घेईल असे मत आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीमध्ये जीवनात कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी परिश्रम प्रामाणिकतेची गरज असून भरत भाऊ अवताडे यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन शेतकरी फोटोग्राफर ते कार्यकर्तृत्वाच्या जोरावर यशस्वी उद्योजक होण्याचा मान मिळवला असुन त्याचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केले. करमाळा येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुदत्त ज्वेलर्स या नावाने सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
करमाळा येथे मेनरोड सुभाष चौक येथे गुरुदत्त ज्वेलर्स या नवीन फर्मचे उद्घघाटन करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की ज्याप्रमाणे भरतभाऊनी शेती फोटोग्राफी ठेकेदारी या क्षेत्रामध्ये यश मिळवले आहे. त्याचपद्धतीने त्यांनी सोन्यासारखी माणसे जपल्याने या व्यवसायामध्ये त्यांना यश हमखास मिळणार आहे त्यांचे थोरले चिरंजीव आकाश आवताडे यांनी नव्याने या व्यवसायाची सुरुवात केली असून वडिलांच्या यशस्वी उद्योजकाची परंपरा तो कायम राखणार असल्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितले.
यावेळी टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव,वाशिंबे गावचे सरपंच .तानाजीबापू झोळ,मांगी वि.वि.सोसायटीचे चेअरमन सुजिततात्या बागल,राष्ट्रवादी युवक कोंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार,मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष नानासाहेब मोरे, महादेव आण्णा फंड,उद्योजक राजुकाका शियाळ संदिप पवार ,सुदर्शन पाटील, दिनेश घोलप तसेच निमंत्रक भरतभाऊ आवताडे,आकाश आवताडे,महेश आवताडे व त्यांचे कुटुंबीय ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!