समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना व दिव्यांगाना दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा: अजय साखरे.
संजय साखरे प्रतिनिधी. समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना व दिव्यागांना दिल्या जाणाऱ्या योजनेचा करमाळा तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना कोर्टी विभागप्रमुख अजय साखरे यांनी केले आहे.
सोलापुर जिल्हा परिषदेकडून लोखंडी बैलगाडी वाटप,शेतीसाठी 5hp ची मोटार, मिनी पिठाची गिरणी,सोलर होमलाईट, मिरची कांडप, मिनी दालमिल, ठिबक संच, तुषार संच, झेरॉक्स मशीन, शेवई मशीन, दिव्यांगाना झेरॉक्स मशीन, स्वयंचलित सायकल, घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य, मिनी पिठाची गिरणी अशा सर्व प्रकारच्या योजना असुन गरजुनी याचा लाभ घ्यावा.
भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील आपल्या विभागामध्ये सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असल्याचे अजय साखरे यांनी सांगितले आहे.
