Wednesday, April 23, 2025
Latest:
Uncategorized

करमाळा बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी व आपट्याच्या पानांची नवरात्रीनिमित्त गेल्या फुलून

करमाळा प्रतिनिधी
नवरात्रीनिमित्त दरवर्षी करमाळा येथील बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांची मोठी आवक होत असते व मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपट्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याच्या पानातून सोने घ्या नाणे द्या अशा प्रकारचा संदेश देऊन एकमेकांप्रति आदरभाव व्यक्त केला जातो तर झेंडूच्या फुलातून दुकान घर मंदिर तसेच इतर वाहनांना मोठ्या प्रमाणात सजावट केली जाते
दरवर्षी करमाळा बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांची तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात आवक होत असते त्याच अनुषंगाने शेतकरीही झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात लागवड करत असतो परंतु यावर्षी च्या परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले झेंडूचे उत्पादन काही प्रमाणात खराब झाले त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होतात व त्या अर्थाने बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांची आवक कमी प्रमाणात झाले व झेंडूच्या फुलांचे भाव ही मोठ्या प्रमाणात वाढले दरवर्षी 25 ते 30 रुपये किलोने मिळणारा झेंडू या वर्षी 50 ते 60 रुपये किलो दराने विकला जात आहे त्यामुळे ग्राहकांकडून झेंडू किती प्रमाणात खरेदी केला जाणार व विक्रेत्यांनाही त्याचा किती प्रमाणात तोटा सहन करावा लागणार हे काही सांगू शकत नाही परंतु कोरोनाच्या परिस्थितीतून सर्व परिस्थिती हळूहळू सुधारत असल्यामुळे व सण उत्सवास काहीप्रमाणात परवानगी मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे हे मात्र तितकेच खरे…..

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group