महावितरण टाळे ठोकण्याच्या इशारा नंतर सहा महिन्यापासून रखडलेले काम केले दिवसभरात पूर्ण टाळे ठोकण्याचा इशारा घेणार मागे- माजी सरपंच औदुंबरराजे भोसले
करमाळा प्रतिनिधी महावितरण टाळे ठोकण्याच्या इशारा नंतर सहा महिन्यापासून रखडलेले काम केले दिवसभरात पूर्ण टाळे ठोकण्याचा इशारा घेणार मागे माजी,सरपंच औदुंबरराजे यांची माहिती
नेरले तालुका करमाळा येथे परंडा वरून घोटी सब स्टेशनला जाणारी मेन लाईन नेरले ते मुंगशी रस्त्याला लागून आहे ती लाईनच्या सहा महिन्यापूर्वी वीज वाहक तारा चार-पाच ठिकाणी तुटल्या होत्या, त्यामुळे अनेक नागरिक अपघात होऊन जखमी झाले होते घोटी सब स्टेशनला साडे तून लाईन जोडून हे चालू केले होते परंतु तुटलेल्या तारा मात्र आज पर्यंत जोडल्या नव्हत्या त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती तसेच नेरले गौंडरे रोड जवळील राजेभोसले ट्रांसफार्मर हा देखील दोन महिन्यापासून बंद होता त्यामुळे जनावरांचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता,त्याबाबत वायरमेन,जूनियर अभियंता साडे, सहाय्यक अभियंता जेऊर यांना मोबाईलद्वारे व समक्ष भेटून अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला,परंतु ही दोन्ही कामे आज पर्यंत केली नव्हती.त्यामुळे दिनांक08/11/2023रोजी जेऊर येथील सहाय्यक अभियंता यांना भेटून आठ दिवसात पूर्ण न केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करणार असलेले निवेदन श्री औदुंबर राजे,सोसायटी संचालक सखाराम ठोंबरे, बापू ठोंबरे,बालाजी ठोंबरे, माणिक गेना काळे ,दादासाहेब ठोंबरे ,आजिनाथ लोंढे, छबन लोंढे ,आबा सरपंच जगताप, चेअरमन तानाजी जगताप, अमोल गवळी या कार्यकर्त्यांनी दिले होते. त्या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री,आमदार,खासदार, कार्यकारी अभियंता बार्शी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक करमाळा,यांना दिले होत्या. त्यावर दिनांक 9/11/2023 पवनपुत्रला ला आलेल्या बातमीचा व दिलेले निवेदनाचा विचार करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 10/ 11/2023 रोजी दिवसभरात दोन्ही कामे पूर्ण केले आहे.त ट्रांसफार्मरला थोडे साहित्य कमी असल्यामुळे तो तात्पुरता सुरू केला आहे.साहित्य आल्यानंतर बाकीचे काम करण्याचे आश्वासन सहाय्यक अभियंता भोयर यांनी दिले आहेत. दिवाळी निमित्त काम झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने महावितरण चे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बंधूंचे आभार मानून आनंद व्यक्त केला जात आहे. काम न करणाराचा समाचार आणि काम करणारा चा सत्कार हा आमचा विचार असल्यामुळे त्यांचा सत्कार करणार असल्याचे श्री औदुंबर राजे यांनी सांगितले त्यामुळे टाळे ठोकण्याच्या आंदोलनाचा दिलेला इशारा माघारी घेत असल्याची माहिती निवेदनाद्वारे,नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे.
