दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या 101 कोटी कामासाठी ई निविदा जाहीर – आ.संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे टप्पा 1 व टप्पा 2 साठी 101 कोटी रुपयाचे टेंडर फायनल झाले असून यामधून वितरिका ,लघुवितरीका, उपलघुवीतरीका या वितरण व्यवस्थेचे काम बंद नलिकेद्वारे केले जाणार असल्याची माहिती आमदारसंजय मामा शिंदे यांनी दिली. ई निविदाचा कालावधी 28 मार्च रोजी सुरू झालेला असून 27 एप्रिल ही त्याची अंतिम तारीख आहे तसेच जिओ टॅगिंग चा कालावधी हा 30 मार्च ला सुरू झालेला असून 4 एप्रिल ही त्याची अंतिम मुदत होती. सदर निविदा उघडण्याची तारीख 18 एप्रिल 2023 असून त्या दिवशी किंवा त्यानंतर ही निविदा माहितीसाठी सर्वांना उपलब्ध होणार आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ही अतिशय महत्त्वाची बाब असून सदर टेंडर प्रक्रिया राबविण्यात साठी आपण 2019 पासून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून आपण प्रयत्नशील होतो. आपण 345 कोटी रुपयांची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळवून दिलेली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील साहेब यांच्याकडे दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी आपण आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्याची विनंती केलेली होती. त्यामुळेच आज दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या इतिहासामधील सर्वोच्च म्हणजेच 101 कोटी रुपयांचे टेंडर फायनल झालेले असून यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची सर्व कामे पूर्ण होऊन 10500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
चौकट …
नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी केलेली कार्यवाही…
1. 21 /12/ 2019- कृष्णा खोरे महामंडळाकडून दहिगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात राज्य तांत्रिक सल्लागार समितीला प्रकल्प अहवाल सादर.
2. 30 /12/ 2019-दहिगाव उपसा सिंचन योजना प्रकल्पासंदर्भात राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून काही मुद्दे उपस्थित.
3. 15 /02/2020 -राज्य तांत्रिक सल्लागार समितीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना अनुसरून महामंडळाकडून शेरे पूर्तता सादर .
4.19 /05/ 2020- राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून आणखी काही मुद्दे उपस्थित.
5. 10 /06/ 2020- राज्य तांत्रिक सल्लागार समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 41 वी बैठक संपन्न .या बैठकीमध्ये दहिगाव उपसा सिंचनच्या प्रकल्प अहवालाबाबत चर्चा.
6. 18 /06/ 2020-दहा जूनच्या बैठकीचे इतिवृत्त उपलब्ध.
7.08/07/ 2020- कृष्णा खोरे महामंडळाकडून राज्य तांत्रिक सल्लागार समितीला अनुपालन अहवाल सादर.
8. 28/ 8 /2020- राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून महामंडळास अंतिम अहवाल शासनास सादर करण्यासाठी तयार.
9.09/09/2020- महामंडळाकडून प्रधान सचिव जलसंपदा विभाग मुद्दा क्रमांक- 27 सहित सादर.
10. 8 /10/2020- शासनाकडून मुद्दा 1 ते 27 पूर्तता अहवाल मागणी सादर .
11. 19/10/2020 -महामंडळाकडून मुद्दा 1 ते 27 पूर्तता अहवाल सादर.
12. 4 /12/2020 – महामंडळाकडून सुधारित अनुपालन अहवाल सादर.
13. 20/10/2021- 342 कोटीची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश.
चौकट…
अपूर्ण लघूवीतरिकेच्या कामांना प्राधान्य —
संजय अवताडे .उपअभियंता ,कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या डावी चारी 6 व उजवी चारी 11 अशा एकूण 17 लघुवीतरिका असून यापैकी ज्या लघवीतरकेची कामे शून्य टक्के झालेली आहेत. अशा लघवीतरीकेची कामे प्राधान्याने केली जाणार असून उजनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रातील वंचित भागांना यामुळे प्राधान्याने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यारंभ आदेश मिळून लवकरच या योजनेची कामे पूर्ण होतील.
