Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

भाजपा स्थापना दिवस करमाळ्यात विवीध उपक्रमांनी उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे प्रभाग क्रमांक १० मधील बूथ वरती भाजपाच्या ४४ व्या स्थापना दिना निमित्त भारत माता, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन मा.सरपंच डॉ.अमोल घाडगे, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर शिंदे, अविनाश कांबळे यांचे शुभ हस्ते केले.

भाजपा तालुका सरचीटणीस अमरजित साळुंके यांचे हस्ते पक्षाचे ध्वजारोहण केले, याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता.
यावेळी वर्धापनदिनानिमित्त
मा.पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी व मा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा जी यांच्या दृष्यप्रणालीव्दारे लाईव्ह भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते अविनाश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले त्यात बोलताना कांबळे म्हणाले की भारत देशाला विकासाच्या प्रगती वरती घेऊन जाणाऱ्या आपल्या पक्षाला चार दशकांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघर्षाच्या प्रेरणेतून पार्टीचा आजपर्यंतचा प्रत्येक कार्यकर्ता हा पार्टी हाच एक ध्यास समोर ठेवून काम करत राहिला आहे, कार्यकर्त्याच्या संघर्षातून, त्यागातून व निष्ठेतून आज पार्टी उभा आहे.

यानंतर पांजरपोळ गोरक्षण संस्था, करमाळा येथे करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोमाता व इतर मुक्या प्राण्यांसाठी हिरव्या चाऱ्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी करमाळा तालुका भाजपा सरचिणीस अमरजित साळुंके, शाम सिंधी, किसान मोर्चा अध्यक्ष विजयकुमार नागवले, संजय गांधी निराधार चे नरेन्द्रसिंह ठाकूर, सोशल मीडिया चे नितीन कांबळे, पांजरपोळ संस्था चे भरत गांधी, जाकीर पठाण, अनुसूचित जाती जमाती चे सचिन खराडे, अभाविप चे संतोष कांबळे, ब्राह्मण संघटनेचे संतोष कुलकर्णी, श्रीरामचंद्र संस्थेचे जयंत दळवी, प्रेमसिंग परदेशी, कपिल मंडलिक, आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group